ब्ल्यू पँथर्सचा ‘मौल्यवान रत्न’ पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
पुरस्कार हे प्रेरणा आणि नव्या पिढीला दिशा देण्याचं काम करतात—वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
पनवेल: पनवेल तालुक्यातील बौद्ध समाजातील पत्रकार, संगीत, गायन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी ब्ल्यू पँथर्स या संघटनेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मौल्यवान रत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
पत्रकारिता गटामध्ये ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, देविदास गायकवाड, संतोष आमले, सुभाष वाघपांजे,शंकर वायदंडे, सनिप कलोते, मुनीर तांबोळी, अक्षय कांबळे, गणपत वरगडा, श्याम साळवी तसेच समाजसेवा गटात महेश साळुंखे, राहुल गायकवाड, कुणाल लोंढे व
गायन, कला, वादन गटात अनेक आणि मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविवारी सकाळी पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक नरेंद्र गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, विजय गायकवाड, सुनील सोनावणे, पत्रकार संजय कदम, महेश साळुंखे, कमलाकर, सचिन कांबळे, नितीन कांबळे, नवनीत गायकवाड, सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी समाजातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“पुरस्कार हे प्रेरणा देतात आणि नव्या पिढीला दिशा देतात. समाजकार्य आणि पत्रकारिता यांचा संगम समाजाला नवचैतन्य देतो.”या प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्ल्यू पँथर्सच्या सर्व सभासदांनी मोठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज सदावर्ते यांनी केले, तर कृष्णा गायकवाड यांनी आभार मानले.