प्रसिद्ध अभिनेते व हास्य सम्राट श्री आसरानी यांचे दुःखद निधन: यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती.

56

प्रसिद्ध अभिनेते व हास्य सम्राट श्री आसरानी यांचे दुःखद निधन: यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती.

प्रसिद्ध अभिनेते व हास्य सम्राट श्री आसरानी यांचे दुःखद निधन: यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती.

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचा बॉलीवूड आणि गुजराती चित्रपट सृष्टीतील प्रवास पाच दशकाहून अधिक काळ चालला त्यांच्या विषयी थोडी माहिती
जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपुर राजस्थान येथे एका सिंधी हिंदू मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांनी सेंट झेवियर्स शाळेतून मॅट्रिक पूर्ण केले आणि जयपूरच्या राजस्थान कॉलेजमधून पदवी घेतली शिक्षण सुरू असताना त्यांनी खर्च भागवण्यासाठी जयपूरच्या ऑल इंडिया रेडिओ मध्ये वाईस आर्टिस्ट म्हणून काम केले अभिनय प्रशिक्षण 1960 ते 1962 या काळात त्यांनी साहित्य कलाबाई ठक्कर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले चित्रपट निर्माते किशोर साहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्या सल्ल्या नुसार 1964 मध्ये त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये प्रवेश घेतला आणि 1966 मध्ये पदवी प्राप्त केले त्यांनी 1988 ते 1993 या काळात एफ टी आय आय चे संचालक म्हणूनही काम केले.
चित्रपट कारकीर्द आणि यश
चित्रपट पदार्पण 1967 वर्षी हरे कांच की चुडिया या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कारकिर्दीचा सुवर्णकाळ विनोदी भूमिका मधील त्यांच्या प्रतिमेमुळे ते 1970 ते 1980 या दशकात हिंदी सिनेमातील एक महत्त्वाचे नाव बंडे त्यांनी नायक व्यक्तिरेखा विनोदी आणि सहाय्यक अशा 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले अविस्मरणीय भूमिका त्यांच्या अचूक कॉमिक टाइमिंग आणि प्रभावी अभिनयासाठी ते ओळखले जात होते रमेश सीपी यांच्या गाजलेल्या शोले 1975 सालाचे चित्रपटातील हिटलरची नक्कल करणाऱ्या जेलरची त्यांची भूमिका भारतीय पॉप कल्चरमध्ये अजरामर ठरली.
राजेश खन्ना आणि नंतर गोविंदा यासारख्या कलाकारा सोबत त्यांची जोडी विशेष गाजली त्यांच्या उल्लेखनीय चित्रपट गुड्डी बावरजी नमक हराम अभिमान चुपके चुपके छोटीसी बात पती पत्नी और वो हेराफेरी आणि हलचल यांचा समावेश आहे
विनोदी भूमिका व्यतिरिक्त त्यांनी चलामुरारी हिरो बनणे 1977 सारख्या चित्रपटामध्ये गंभीर भूमिका ही साकारल्या.
दिग्दर्शन आणि पुरस्कार:
असरानी यांनी 1974 ते 1997 दरम्यान चला मुरारी हिरो बनाने आणि सलाम मेमसाब यासह सहा चित्रपटाचे दिग्दर्शन केले यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठी दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले 1974 मध्ये आज की ताजा खबर आणि 1977 मध्ये बालिका वधू साठी.
त्यांचे लग्न अभिनेत्री मंजू बंसल अन्सारी यांच्याशी झाले होते असरानी हे एक अष्टपैलू आणि सातत्यपूर्ण कलाकार म्हणून ओळखले जात होते त्यांनी आपल्या मनमोहक शैलीने आणि साधेपणाने भारतीय चित्रपट सृष्टीत हास्याचा एक अमित ठसा उमटवला असरानी यांचे 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84 वर्षी निधन झाले. (सर्व माहिती गुगल वरून सर्च केलेली आहे)