पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा भेट.
पनवेल(प्रतिनिधी): पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर व उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांनी दिवाळी शुभेच्छा पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
या भेटी मध्ये पनवेल व उरण विधानसभा क्षेत्रातील विकास कामे यांच्यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाचा संदेश दिला आहे ही दिवाळी सर्वांना सुखकारक आणि पर्यावरण पूरक साजरी करा असं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे.