*पालघर जिल्ह्यात डहाणू येथे किसान सभेच्या नेतृत्वाखाली १००० शेतकऱ्यांचे जबरदस्त रेल रोको आंदोलन*

48

*पालघर जिल्ह्यात डहाणू येथे किसान सभेच्या नेतृत्वाखाली १००० शेतकऱ्यांचे जबरदस्त रेल रोको आंदोलन*

आज १८ फेब्रुवारीला पालघर जिल्ह्यात डहाणू येथे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली १,००० हून अधिक स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या ताफ्याशी झुंज देऊन जबरदस्त रेल रोको आंदोलन यशस्वी केले. पोलिसांनी डहाणू तालुक्यातील सर्व रस्त्यांवर सकाळपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता आणि तलासरी, डहाणू व विक्रमगड या तिन्ही तालुक्यांतून आंदोलनासाठी येणाऱ्या हजारों लोकांना अडवून ठेवले. तरी सुद्धा गनिमी काव्याने १००० हून अधिक शेतकरी डहाणू रेल्वे स्टेशनावर पोहोचलेच आणि रेल रोको आंदोलन यशस्वी झालेच! सर्व प्रसारमाध्यमांनी त्यास जोरदार प्रसिद्धी दिली.

मोदी सरकारचे तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्या, हमी भावाचा कायदा करा, वनाधिकार कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा, पेट्रोल डिझेलचे प्रचंड वाढलेले भाव कमी करा, अशा घोषणांभोवती झालेल्या या रेल रोको आंदोलनाचे नेतृत्व बारक्या मांगात, आमदार विनोद निकोले, किरण गहला, चंद्रकांत घोरखाना, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, राजा गहला, एडवर्ड वरठा, शंकर गोवारी, लहानी दौडा, सुनीता शिंगडा, सविता डावरे, रसीला धोडी, लता घोरखाना, अनिल झिरवा, संतोष खटाले, सुरजी वेडगा, सुहास सुरती, हर्षल लोखंडे, डॉ. आदित्य अहिरे इत्यादींनी केले.