हिंगणघाट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

प्रशांत जगताप प्रतीनीधी 19 फेब्रुवारी
हिंगणघाट:- आज छत्रपती शिवाजी जयंती निमित्त संत चोखाबा वार्ड येथे वंचित बहूजन आघाडीचे कुणाल वासेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सर्वत प्रथम तथागत बुद्ध यांना महादेव कुंभारे यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंचित आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ नेते अशोक रामटेके यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले. महात्मा जोतिबा फुले यांना गोविंद मुळे यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रकाश भुसारी यांनी माल्यापर्ण करुन अभिवादन केले. माता रमाई यांना गौरव जोडाणगडे यांनी अभिवादन केले.
