कळमेश्वर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेशिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
Celebrate Shivaji Maharaj Jayanti with enthusiasm on behalf of Kalmeshwar Vanchit Bahujan Aghadi.
युवराज मेश्राम प्रतिनिधी 19 फेब्रुवारी
कळमेश्वर:- येथील शिवाजी चौक तळ्याची पार येथे दिनांक 19 फेब्रुवारी ला सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य शिवजयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी च्या महासचिव वर्षाताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुणजी गजभिये, बेबीताई बांबल ह्या होत्या यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कळमेश्वर तालुका अध्यक्ष अशी चुनारकर, बेबीताई बांबल, देवरावजी भांगे, गुलाबराव मडके, निरकार सिंग बावरी, सुमित्रा तायडे, शारदा सोमकुवर, किशोर ताजने, निलेश सोमकुवर, भीमराव सोमकुवर, अनिल बागडे, किशोर चूनारकर, कमलेश शिरसागर, कृष्णा ढोके या सर्वांनी शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन करून शिवाजी महाराजाविषयी प्रमुख वक्ते यांनी मार्गदर्शन करून शिवाजी महाराजांविषयी घोषणा देण्यात आल्या. शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणजी गजभिये यांनी केले तर प्रस्ताविक आशिष चूनारकर यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.