वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन संपन्न*

38

*वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन संपन्न*

आदित्य खंदारे
माहूर (प्रतिनिधी)
7350030243

माहूर: वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याने महाराष्ट्रातील 358 तालुक्यांमधील ५०००+ देश प्रेमीसोबत सार्धशताब्दी महोत्सव अत्यंत उत्साहात माहूर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य फारुकी वासे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माहूरचे तहसीलदार श्री. अभिजीत जगताप हे होते. द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर मार्गदर्शक औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य उपस्थित होते, व नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची उपस्थिती होती तर तालुक्यातील सर्वच प्रशासन विभाग व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वृंद, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी विविध पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती मध्ये वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. संस्थेमार्फत वंदे मातरम या गीताला सादर करण्यासाठी श्रीमती प्रतिभा पाटील यांनी वंदे मातरम या गीताचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री जगदीश तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाई बाजार तर्फे वंदे मातरम गीतावर लघु नाटिका सादर करण्यात आले. या लघु नाटिकेचे मार्गदर्शक स.शि. मिलिंद कंधारे, भोला सलाम, गुरुसिंग वाळके, कु. अनुराधा चौधरी, गंगम्मा पोलासवार हे होते तर लघु नाटिकेचे सादरीकरण जिनेरा शेख, शबनम शेख, आयशा खान, यास्मिन खान, आदिना खान, नेहा आडे, खुशी राठोड, गायत्री भुरे, आर्यन शेख, राम मिराशे, शिवाजी पाटील, ओम सोनुले, तस्मिया शेख या चिमुकल्यांनी कार्यक्रमाच्या मंचावर अगदी सुंदर असे लघु नाटिकेचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सुरेख संचलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे माहूर तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आम्रपाली रामटेके यांनी केले .आभार प्रदर्शन श्रीमती के.पी.वाकोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. के. जगदाळे यांनी केले तर गटनिदेशिका ए. एन. पोतदार श्री. आर. वी ठमके, कु. पि. एल. बुटले, श्री. एस. एस. डाखोरे, एन. बी. चिरडे, श्री. यू. डी, चव्हाण, कु. व्ही. डि मानकर, श्री. एम. आर. मेकलवार, कु. कुसुम मेशेकर, कु. रागिणी मेटेकर, व मेस्को सुरक्षा रक्षक श्री. आर. डि. देशमुख,श्री. व्ही. पवार, श्री ए. बि. ठाकरे, श्री. बि. जि. मुंडे, यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाले.