बालदिनानिमित्त रविंद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळा श्रीवर्धन, येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर.

37

बालदिनानिमित्त रविंद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळा श्रीवर्धन, येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर.

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

श्रीवर्धन | बालदिना निमित्त रविंद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळा, (कोकण उन्नती मित्र मंडळ संस्था) यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठा प्रतिसाद दिला.

या शिबिरात एकूण २७१ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. विविध वयोगटातील मुलांमध्ये नजरेचे दोष, वाचनातील अडचणी, डोळ्यांचे आरोग्य यासंबंधी सखोल तपासणी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ दृष्टीदोष आढळून आला असून त्यासाठी पुढील उपचारांची सूचना नेत्रतज्ज्ञांनी दिली.

शाळेच्या मुख्याध्यापिका नियती रिकामे यांनी बालदिनानिमित्त मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत डोळ्यांचे आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे व्हावे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकाऱ्यांनी मुलांमध्ये नेत्र संवर्धनाबाबत जागरूकता वाढावी यासाठी माहितीपर मार्गदर्शन केले. शाळेच्या व्यवस्थापन समितीने या यशस्वी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले.

बालदिनानिमित्त आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढवणारा आणि समाजहिताची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.