जनजाती गौरव दिन : पेसा गाव वैतागवाडी येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला*

68

*जनजाती गौरव दिन : पेसा गाव वैतागवाडी येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला*

विक्रमगड प्रतिनिधी
भारत पाटारा -8779829335

विक्रमगड : जनजाती समाजाचे प्रेरणास्रोत आणि महान क्रांतिकारक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांची जयंती, जनजातीय गौरव दिनानिमित्त पेसा गाव वैतागवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला वैतागवाडी गावातील जनजाती बांधव, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आली.
जनजाती समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करणे, तसेच त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी भारत पाटारा यांनी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या क्रांतीकारी कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी समाजाला एकत्र येऊन काम करण्याचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजावले.
जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साहाचे वातावरण प्राप्त झाले.
उपस्थित नागरिकांनी बिरसा मुंडा यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा आणि समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
हा कार्यक्रम वैतागवाडी गावातील जनजाती बांधवांसाठी एक प्रेरणादायी आणि चैतन्यदायी सोहळा ठरला.