पुरोगामी महाराष्ट्रात, उकळत्या तेलातून नाणे काढण्याच्या घटनेला धक्कादायक वळण पोलीस कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार.

52

पुरोगामी महाराष्ट्रात, उकळत्या तेलातून नाणे काढण्याच्या घटनेला धक्कादायक वळण पोलीस कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार.

 In progressive Maharashtra, a shocking turn to the incident of coin extraction from boiling oil was sexually abused by a police officer.

उस्मानाबाद:- उकळत्या तेलातून पाच रुपयाचं नाणं बाहेर काढण्यास सांगून पतीने पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा घेतल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडल्याचे समोर आलं आहे. ही घटना घडण्याआधी संबंधित महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला असून यात एका पोलिसाचाही समावेश असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान,हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या महिलेने समोर येत या प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली. पतीचे समर्थन करीत तिने पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप सोमवारी केला आहे.

या पीडित महिलेने गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित माझायावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात केला आहे. पीडित महिला आणि तिचा पती आता माध्यमांसमोर आले असून, त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

सदर पोलीस कर्मचारी नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. असा धक्कादायक आरोप करण्यात आला असून, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गरम तेलात हात घालून नाणे काढण्यास लावणाऱ्या पती व अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध सोलापुरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सोलापुरात येऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना भेटून या ठिकाणीच फिर्याद घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यामुळे गुन्हा दाखल केला.