Home E-Paper नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणीपुरवठा सुरू; प्रशासक सुजित धनगर व कर्मचारी वर्गाचा सत्कार
नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी नेरळ ग्रामपंचायत ठरली यशस्वी
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
नेरळ: नेरळ ग्रामपंचायतीतर्फे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर वेगाने उपाययोजना राबवून अखेर सुरळीत व नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या कार्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक सन्माननीय सुजित धनगर तसेच अरुण कार्ले व ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचाऱ्यांचे आज विशेष अभिनंदन करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या हस्तक्षेपामुळे नेरळ शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला पाणीपुरवठ्याचा अडथळा दूर करण्यात आला. यासाठी प्रशासक धनगर यांनी स्वतः पुढाकार घेऊन जलवाहिन्यांची तपासणी, दुरुस्ती तसेच पुरवठ्याची नियमितता राखण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तत्परतेने उभी केली. कर्मचाऱ्यांनीही दिवस-रात्र मेहनत घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.
या प्रसंगी समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून प्रशासक सुजित धनगर व कर्मचारी वर्गाचा सत्कार करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या कार्यक्रमामध्ये श्री. अंकुश दाभणे, जयवंत साळुंखे, सुरेश राणे, किसन शिंदे, पंढरीनाथ चंचे, संदीप जाधव, खोलमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या कार्यशैलीचे कौतुक करत सांगितले की, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असून त्यात नेरळ ग्रामपंचायत यशस्वीपणे उतरली आहे. पाणीपुरवठा नियमित झाल्याने नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेरळ शहरात पुढील काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन असल्याचेही प्रशासक धनगर यांनी सांगितले. नियमित पुरवठा राखण्यास ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.