आगरी समाजातील मुलगी झाली उत्तीर्ण सीए

66

 न्हावा येथील मानसी भोईर यांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!

उमेश दांडगे 

खारघर प्रतिनिधी 

77382 23123

उलवे : न्हावा येथील मानसी शिवनाथ भोईर ही सीएच्या परीक्षेत नुकतीच पहिल्या प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तिचे ‘सुखकर्ता’ बंगल्यावर अभिनंदन केले. गुणवंती शिवनाथ भोईर यांची कन्या, तर माजी सरपंच हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे यांची ती भाची आहे. 

रोटरी एज्युकेशन सोसायटीमध्ये तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण उरण एज्युकेशन सोसायटी, तर बीबीए पुणे विद्यापीठाच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बेलापूर येथे झाले. सध्या मानसी उरण-बोरी येथे स्थायिक असून आगरी समाजातील मुलगी सीए झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.