कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पाणी फाउंडेशन फार्मर कप* यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

44

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पाणी फाउंडेशन फार्मर कप* यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- आज दिनांक 19/11/2025 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय सिंदेवाही येथे *महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पाणी फाउंडेशन फार्मर कप* यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणाच्या दरम्यान पाणी फाउंडेशन च्या प्रशिक्षकांद्वारे शेतकरी वर्गाला *गट शेती* या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फार्मर कप स्पर्धा 2026 च्या तयारीसाठी शेतकरी बांधवांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि त्या माध्यमातून शेतीमध्ये उन्नती साधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. उपस्थित शेतकरी बांधवांसोबत विविध विषयांवर सुसंवाद साधण्यात आला. दरम्यानच्या काळात पीएम किसान हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात दाखवण्यात आला तसेच महाविस्तार-AI या अँप बद्दल तालुका कृषि अधिकारी कु. कल्याणी औटी मॅडम यांनी मार्गदर्शन करून ते शेतकरी बांधवांना ते डाऊनलोड करण्यास संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देखील तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही कु.कल्याणी औटी मॅडम यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले सिंदेवाही तालुक्याचे मा. तहसीलदार एस. जी. वहाणे सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कृषि अधिकारी श्री. नवनाथ शिंदे यांनी तर सूत्रसंचालन कृषि सेवक श्री.एस.टी.गावडे यांनी केले.यावेळी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी यादव बारापात्रे, उपकृषि अधिकारी ज्योती चिडे, पाणी फौंडेशन प्रशिक्षक श्री हितेश सरप,दिलीप देवतळे, तपस्वी खेलूरकर, आशिष मोहुर्ले,प्रविण सावके, इम्रान पठाण, मोहन गावंडे यासोबत कृषि विभागाचे सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, विविध गावचे सरपंच, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सर्व कृषि ताई यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.