हिंगणघाट ऍडव्होकेट बार असोसिएशनला नागपुर उच्च न्यायालयाचा झटका.

53

हिंगणघाट ऍडव्होकेट बार असोसिएशनला नागपुर उच्च न्यायालयाचा झटका.

हिंगणघाट बार असोसिएशनला ऍड. विजय ढेकलेला विरोधकरण भोवल.

 

 Hinganghat Advocate Bar Association's Nagpur High Court blow.

हिंगणघाट:- हिंगणघाट बार असोसिएशनला नागपुर उच्च न्यायालयाने “जोरका झटका धीरेसे” दिला आहे. त्यामुळे हिंगणघाट न्यायालयातील बार असोसिएशनचा सुरु असलेला वाद हा जगासमोर आला आणी हिंगणघाट बार असोसिएशनचा नाचकी झाली.

हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकील अधिवक्ता विजय रामचंद्रराव ढेकले हे हिंगणघाट येथील अंकिता जळीत कांडाचे आरोपी विक्की नगराळेची बाजु मांडण्याकरिता यांनी आपला वकालत नामा दाखल केला होता. त्या विरुद्ध हिंगणघाटच्या ऍडव्होकेट बार असोसिएशनने 17 डिसेंबर 2020 रोजी ठराव घेऊन ऍड विजय ढेकले ला कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यामुळे ऍड. विजय ढेकले हे हिंगणघाट ऍडव्होकेट बार असोसिएशन विरुध्द नागपुर उच्च न्यायालय दाद मागण्याकरीता याचीका दाखल केली होती. या याचीकेचा निकाल जज नितिन जमादार आणी अनिल किलोर यांनी 23 फेब्रुवारीला दिला. या निकाला मुळे हिंगणघाट ऍडव्होकेट बार असोसिएशनची नाचकी झाली.

 Hinganghat Advocate Bar Association's Nagpur High Court blow.

या निकालात वकिलाला प्रतिबंधित किंवा धमकावणे शक्य नाही. आरोपींचे प्रतिनिधित्व करत असताना बार असोसिएशन वकीलांना रोकु शकत नाही. ते त्यांचे कर्तव्य बजावत आहे. कुठल्याही आरोपीला खटल्यात वकील उभा करण्याचा हक्क आहे. हिंगणघाट बार असोसिएशनचे सदस्यांना आम्ही आशा करतो की पदाधिका-यांना शहाणेपणा येईल. आम्ही नागपुर उच्च न्यायालय असे निर्देश देतो की प्रतिवादी ऍडव्होकेट विजय ढेकले वर हिंगणघाट बार असोसिएशनच्या वतीने कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे आदेश नागपुर उच्च न्यायालयाने दिला.