अब्दुल कादर हुसेन बोहरा यांनी घेतला भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- अब्दुल कादर हुसेन बोहरा (व्यवसायिक) यांनी भारतीय जनता पार्टी हिंगणघाट मध्ये प्रवेश घेतला. आमदार समीरभाऊ कुणावार यांनी अब्दुल कादर हुसेन बोहरा यांचा भाजपा मध्ये भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी त्यांना भाजपा टॉवेल टाकून प्रवेश करण्यात आला. या प्रसंगी हिंगणघाट शहराचे नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतनी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. नितीनजी मडावी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान, नगरसेवक चंदूभाऊ माळवे, समाजसेवक सुनीलभाऊ डोंगरे इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश कार्यक्रमाला शहरातील बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.