Home latest News जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा
त्रिशा राऊत
नागपूर जिल्हा क्राईम रिपोटर
मो.90968179530
उमरेड (नांद ) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक २६/११/२०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला दिनाची सुरवात जिल्हा प्राथमिक शाळा नांद आणि नांद येथील बोद्ध विहारात पण घोषणाबाजी आणि प्रेरणदायी विचार त्या मुळे गावात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन संविधान दिवस साजरा करण्यात येतो संविधान दिनाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद क्र.1 शाळेतील संविधान दिवसानिमित्त गावातून रॅली काढून बुद्ध विहारात वंदना घेण्यात आली उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नन्नावरे सर शाळेतील शिक्षिका कुंदाताई घोडमारे मॅडम तसेच शाळेचे शिक्षक विलास रुईकर सर तसेच गावातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आजच संविधान दिनाच्या निमित्ताने सायंकाळी नांद येथील बुद्ध विहार येथे सायंकाळी बुद्ध वंदना घेऊन संविधान दिन साजरा करीत आहेत उपस्थिती
पंकज मेश्राम, उमेश पाटील , धीरज बागेश्वर , लता कांबळे , मंजु पाटील विद्या पाटील उत्तमजी आंबुलकर मनिषा सुखे, त्रिशा राऊत . लहान चिमुकले पण जास्तीत जास्त संख्ये ने उपस्थितीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.