Home latest News भिंगार ग्रुप ग्रामपंचायत व भीम प्रेरणा मित्र मंडळ यांच्या वतीने संविधान सभा...
भिंगार ग्रुप ग्रामपंचायत व भीम प्रेरणा मित्र मंडळ यांच्या वतीने संविधान सभा उपक्रम पडला पार
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल/भिंगार: भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत केली त्यानंतर ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधानाचा जागर केला जातो.
भिंगार ग्रुप ग्रामपंचायत व भीम प्रेरणा मित्र मंडळ यांच्या तर्फे संविधान सभा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंच गुलाब रामदास वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून, भारतीय संविधानाने महिलांसाठी लाख मोलाचं योगदान दिल्याचे सरपंच गुलाब वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं.
भीम प्रेरणा मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी संविधानाचे महत्व विषद केले, तर सचिव रघुनाथ गायकवाड यांनी ही संविधानाविषयी आपलं मत व्यक्त केलं.
“संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून ते जोपासला पाहिजे” असं आवाहन सदस्य सुनील पाटील यांनी यावेळी केलं.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी विवेकानंद वास्कर,लिपिक ज्ञानेश्वर पाटील, संतोष गायकवाड, प्रशांत कांबळे,महेंद्र कांबळे, प्रकाश बाबरे, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.