लग्नसराई वृत्तवैकल्यामुळे जिल्ह्यात फुलांची मागणी वाढली

87

लग्नसराई वृत्तवैकल्यामुळे जिल्ह्यात फुलांची मागणी वाढली

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
८४२०३२५९९३

अलिबाग:- तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरवात होते. लग्नसराई आणि मार्गशीर्ष महिना सुरु झाल्याने बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. या महिन्यात घरोघरी गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे नारळ फुल आणि पूजेच्या विविध वस्तुंना मागणी असते.
लग्न सोहळा आणी धार्मिक विधी यासाठी फुलांची मागणी असते. त्यामुळे सध्या बाजारात फुले महाग झाली असल्याचे चित्र बघयला मिळत आहे. पूजेच्या साहित्यातील महत्वाचा घटक असलेल्या फुलांना सध्यातरी अच्छे दिन आले असे म्हणायला हरकत नाही.
कागदी आणि प्लास्टिक फुलांचा ट्रेंड असला तरी फुलांना नेहमीच मागणी असते. अलीकडच्या काळात लग्न समारंभात इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्यांकडून सजावटीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे संबंधित कंपन्या मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करतात. लहान मोठ्या कार्यक्रमांना देखील फुलांची मागणी असते. त्यामुळे बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. जलवाहतुकी मुळे मुंबई येथून विविध प्रकारची फुले आणणे शक्य होते.
मार्गशीर्ष महिना सुरु झाल्याने घरोघरो देवीची पूजा घट मांडले जातात. देवीच्या सजावटीसाठीही फुले खरेदी केली जातात. गाजरे हार वेण्या यानंही मागणी असते. नगर परिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. ७ दिवसानंतर निकाल लागेल त्यावेळीही बुके मोठ्या प्रमाणात लागतात. या सर्वांमुळे फुलवाल्यांचा धंदा तेजीत आहे .
फुलाची शेती हि पुणे अहिल्यानगर चाकण बारामती येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. रायगड मध्ये हि शेतकऱ्यांनी फुलांची शेती करण्यास सुरवात केली आहे. धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल येथे कायम असते. त्यामुळे फुलांना नेहमीच मागणी असते.