महाराष्ट्रातील बाजार समिती संदर्भात अभ्यास गटात – अॅड. सुधिर कोठारी.

आशीष अंबादे प्रतिनिधि 25 फेब्रुवारी
हिंगणघाट:- संपुर्ण महाराष्ट्रातील भविष्यात बाजार समिती अधिक सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना करावयास पाहिजे यासाठी पणन संचालक पुणे यांनी तयार केलेल्या अभ्यास गटाची स्थापना केलेली असून त्यात अशासकीय सदस्य म्हणून हिंगणघाट येथील बाजार कमिटीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी भविष्यात करावयाची वाटचाल, कामकाजात अधिक पारदर्शकता ठेऊन शेतकर्यांना बाजार समितीकडे आकर्षित करणे, उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधणे या बाबीवर सखोल विचार विनिमय करून बाजार समितीना अधिक सुदृढ करण्यासाठी काय करावयास पाहिजे यावर ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. या समितीत 19 सदस्य असून 16 सदस्य शासकीय तर 3 सदस्य अशासकीय आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी पणन संचालक सतीश सोनी पुणे हे आहेत. या अतिशय महत्वपूर्ण समितीवर पणन संचालकांनी अॅड. कोठारी यांची नियुक्ती झाल्या मुळे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकारी मंडळाने अॅड. सुधिर कोठारी यांचे अभीनंदन केले.