इम्रान खान तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत, आध्यात्मिक गुरुशी सूत जुळलं!

60

कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. आध्यात्मिक गुरु बुशरा मेनका हिच्यासोबत इम्रान खान यांनी लग्नाची गाठ बांधली.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर पीटीआय पक्षाने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन इम्रान खान यांना लग्नाच्या शुभेच्छा देऊन, लग्नाच्या बातमीवरही शिक्कामोर्तब केले.
इम्रान खान आणि पत्नी बुशरा मेनका यांच्या लग्नाचे फोटोही पीटीआयने ट्विटर हँडलवरुन शेअर केले.