वर्धा उत्तम गलवा कंपनी स्फोट प्रकरणात दोषारोप पत्र दाखल.

61

वर्धा उत्तम गलवा कंपनी स्फोट प्रकरणात दोषारोप पत्र दाखल.

कधी पर्यंत मजदूराचा जीवाशी कंपनी खेळणार?
खरच कामगाराना लवकर न्याय मिळणार?

Wardha Uttam Galwa company files chargesheet in blast case.
Wardha Uttam Galwa company files chargesheet in blast case.

आशीष अंबादे प्रतिनिधि 24 फेब्रुवारी
वर्धा:- जिल्हातील भूगाव येथील उत्तम गलवा यांच्या स्ट्रील कंपनीत 3 फेब्रुवारीला भीषण स्फोट होऊन अनेक कर्मचारी गंभीर जखमी आणी मयत झाले होते. या अपघाताची चौकशी पूर्ण करून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने प्रकरण आज बुधवार 24 रोजी न्यायप्रविष्ठ केले. कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा ठपका औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आला आहे. उत्तम गलवा कंपनीत झालेल्या अपघातात 39 कामगार भाजल्या गेले. त्यापैकी दोन कामगारांचा उपचारादरम्यान नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर काही जखमी कामगारांवर अजूनही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अपघातानंतर कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, पालकमंत्री सुनील केदार, तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर 21 दिवसांत चौकशी पूर्ण करून नागपूर येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी प्रकरण वर्धा येथील न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयात उत्तम गलवा कंपनी विरोधात जवळपास 50 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात तब्बल दहा पानांच्या चौकशी अहवालाचा समावेश आहे.