स्वानंद सार्वजनिक वाचनालयात महा परिनिर्वाण दिन, संत जगनाडे जयंती, श्रीदत्त जयंती साजरी.

64

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात महा परिनिर्वाण दिन, संत जगनाडे जयंती, श्रीदत्त जयंती साजरी

केज/ प्रतिनिधी: स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती चर्चासत्र घेवून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.यावेळी घेण्यात आलेल्या चर्चासत्रात एस. के.वैरागे,बाळासाहेब गायकवाड यांनी सहभागी होवून मार्गदर्शन केले.

श्रीसंताजी महाराज जगनाडे यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची गाथा पुनर्लेखनाचे महान कार्य श्रीसंताजी महाराज जगनाडे यांनी केल्याचे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी व्याख्यान व परिसंवाद कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.

सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर एस.के.वैरागे यांचे छोटे खानी व्याख्यान झाले. त्यानंतर परिसंवादघेण्यात आला.या परिसंवादात वामन गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड,रमेशराव गायकवाड,अरुण गायकवाड,ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी सहभाग घेतला.

परिसंवादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्व व क्रांतीसिंह नाना पाटील यांचे कार्य कर्तृत्व यावर परिसंवाद झाला.मान्यवरांनी मोजक्या शब्दात परिसंवादात आपली मते मांडली.अध्यक्षीयसमारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. देशाच्या जडणघडणीत व समाज परिवर्तनाच्या लढ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान होते तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत पत्री सरकार स्थापन करून स्वातंत्र्यासाठी समाजाला जागे करून प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढ्यात लोकांना सहभागी करून चळवळीचे व स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व नाना पाटील यांनीकेले.स्वातंत्र्य चळवळीत नाना पाटलांचे योगदान मोठे होते असे प्रतिपादन डॉ.वसुदेवबप्पा गायकवाड यांनीअध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.

कार्यक्रमाला रावसाहेब जाधव,प्रकाश गायकवाड, पांडूरंग गायकवाड,ए.बी. गायकवाड,रविंद्र गायकवाड यांच्यासह युवक,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक,वाचक, हितचिंतक यांचीउपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी श्रीदत्त जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम श्रीदत्तात्रय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

श्रीदत्तजयंती कार्यक्रमाला वाचक,अध्यात्मिक भाविकांची उपस्थिती होती.