डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाने उमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

73

नागरिकांनी केले आभार व्यक्त

केज/प्रतिनिधी: केज शहरातील उमरी रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे लाईट नसायची या भागात लाईटचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला होता. परंतु याकडे कोणी लक्ष देत नव्हते. काही नागरिकांनी लाईटचा प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांच्याकडे मांडला.

उमरी रोड परिसरातील वाढती लोकसंख्या व या भागात अतिशय कमी दाबांमध्ये विज उपलब्ध असायची सातत्याने डीपी जळायचा तर काही वेळा डीपी मध्ये बिघाड असायचा तर काही वेळा फ्युज नसायच्या अशा अनेक अडचणींना या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत होते. महावितरण कार्यालयाकडून अनेक वेळा नवीन डीपी मंजूर झालेला असताना जाग्या अभावी नवीन डीपी बसवता येत नव्हता, या भागात नवीन डीपी बसवण्यासाठी जाग्याचा प्रश्न उद्भवत होता परंतु गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा करून व इरिगेशन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस नवीन डीपी बसवण्यासाठी जागा देण्याची विनंती करून पाठपुरावा केला.

इरिगेशन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीपी बनवण्यासाठी जागा देण्याचा शब्द हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांना दिला. शुक्रवार रोजी प्रत्यक्षात डीपीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यापुढे उमरी रोड भागातील व परिसरातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

या भागात नवीन डीपी बसवण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न होता तो प्रश्न डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांनी मार्गी लावला. गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश आले आहे असे या भागातील नागरिक डीपीचे काम चालू असताना बोलत होते. गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्याबद्दल या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.