मुंबई मुंब्रा बायपासवर कंटेनर उलटल्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी.

56

मुंबई मुंब्रा बायपासवर कंटेनर उलटल्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी.

Container overturns on Mumbai-Mumbra bypass
Container overturns on Mumbai-Mumbra bypass

अस्मिता सपकाळ प्रतिनिधी 25 फेब्रुवारी
ठाणे:- मुंब्रा बायपास रोडवर कंटेनर पलटी झाल्याने ठाणे शहरातील वाहतुकीचे तीन – तेरा वाजले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ठाणे शहरात वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून येत होते. सकाळी कामासाठी निघालेल्या नोकरपेशी आणी चाकरमान्यांचे या वाहतुक कोंडीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. रस्त्याच्या मधोमध उमटलेल्या कंटेनर हरवण्यासाठी तीन हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली पण वेळ लागत असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला.

मुंब्रा बायपास रोडवरील हॉटेल लाल किल्ला जवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक कंटनेर पलटला रस्त्याच्या मधोमध आडवा झाला होता. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी या घटनेमुळे मुंब्रा बायपास रोडवर मोठया प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. त्यातून ही कोंडी सकाळी हळूहळू वाढत शहरात कोंडीचे चित्र पाहण्यास मिळून लागले. त्यातच सकाळी कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडलेल्या चाकरमानी या कोंडीत अडकून पडले आहे. मुंब्र्यात रस्त्याच्या मधोमध उमटलेल्या कंटेनर हलविण्यासाठी तीन हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली असून त्यानुसार तो कंटेनर हलविण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.