पनवेलमध्ये तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण…

73

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे तब्बल ३०८ कोटी रुपयांचे भूमिपूजन व लोकार्पण

कृष्णा गायकवाड

तालुका प्रतिनिधी

9833534747

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण दिनांक 15 डिसेंबर रोजी माजी मंत्री भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या लोकार्पणाचा प्रमुख कार्यक्रम लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, पनवेल येथे दुपारी संपन्न झाला. यावेळी महापालिका क्षेत्रातील नागरिक तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, परेश ठाकूर, प्रीतम म्हात्रे व जिल्ह्यातील विविध मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या या विकासकामांमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊन जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा संपन्न 

पनवेल शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण:

1. पिसार्वे तलाव पुर्नज्जीवित व सुशोभिकरण कामाचे लोकार्पण

2. कोयनावेळे व घोट या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पुलाचे लोकार्पण

3. प्रभाग समिती-अ, खारघर येथील प्रभाग कार्यालय लोकार्पण

4. खारघर येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

5. प्रभाग समिती ब कळंबोली नोड मधील आयडीबीआय बॅंक, सेक्टर- ८ ते सन शाईन सोसायटी पर्यंत काँक्रिटीकरण रस्त्यांचे लोकार्पण

6. प्रभाग समिती ‘ब’, कळंबोली येथील सेक्टर -८ई मधील प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण

7. प्रभाग समिती क मधील कामोठे येथील सेक्टर-११ मध्ये प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण

8. लोकनेते दि.बा. पाटील यांच्या बद्दल माहिती दर्शविणारे म्युरल व सुशोभित कक्ष (स्मारीका) कामाचे लोकार्पण

विविध विकासकामांचे भूमिपूजन:

1. नवीन पनवेल पश्चिम सेक्टर- १८ माता व बालसंगोपन केंद्राचे भूमीपूजन

2. प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री आवास योजने अंतर्गत पनवेल बस स्थानकामागे कुष्ठरोग पिडीतांसाठी व खुल्या विक्रीसाठी प्रस्तावित गृहप्रकल्पांचे बांधकामाचे भूमीपूजन

3. प्रभाग समिती क मधील लायन्स गार्डन ते पी.डब्ल्यु डी. ऑफिस ते जुने कोर्ट ते बंदर नाका पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन

4. प्रभाग समिती ड व्यावसायिक दुकाने बहुमजली वाहनतळ बांधणे कामाचे भूमीपूजन