बाबुपेठ येथील दोन्ही रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने बंद केल्या मुळे हजारो लोकांना नाहक त्रास

33

बाबुपेठ येथील दोन्ही रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने बंद केल्या मुळे हजारो लोकांना नाहक त्रास

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016

चंद्रपूर :- येथील बाबुपेठ चंद्रपूर परिसरातील अनेक वर्षांपासून दोन गेट चालत होते आणि या दोन्ही गेट मधून चंद्रपूरातील सर्वात मोठा असलेला प्रभाग म्हणजे बाबुपेठ आहे आणि याच बाबुपेठ च्या दोन्ही गेट मधून लोकांची ये- जा होत होती आणि आता जेमतेम काही महिन्यापूर्वी या दोन्ही रेल्वे वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा ते बागला चौक उडान पूल सुरु करण्यात आला आणि दुसरा मार्ग म्हणून अंडरपास मार्ग महाकाली कॉलरी मधून करण्यात आला पण या दोन्ही ये- जा करण्यासाठी बनवण्यात आलेल्या साधनाचा उपयोग चांदा फोर्ट रेल्वे ने येणाऱ्या जाणाऱ्या हजारो पॅसेंजर साठी आणि रमाई नगर , फुले चौक, बुरड मोहल्ला, मस्जिद चौक, सोनझरी मोहल्ला,ढिवर मोहल्ला श्रीराम चौक, आणि अजून काही असे वार्ड आहेत की त्यांना अजिबात उपयोगी पडत नाही आणि म्हणूनच या सर्व भागातील नागरिक या रेल्वे गेट मधून ये ,- जा करतात रोजनदारीने कामावर जाणारे म्हातारी माणसं, स्त्रिया , बाबुपेठ परिसरातून सिटी मध्ये शिक्षण घेणारे विध्यार्थी, बाबुपेठ मधून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर वर्ग स्त्रिया व माणसं बाबुपेठ परिसरातील लोक ये – जा करत होते त्याच बरोबर, लहान ट्राली घेऊन भाजीपाला विकणारे, आणि हाथ गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक, आणि विशेष म्हणजे बाबुपेठ येथील बाबुराव शेडमाके हॉल जवळील लोक हे मरण पावलेल्या लोकांना घेऊन महाकाली कॉलरी येथील स्मशान भूमी कडे जाणारे लोक दफन करतात तसेव या बाबुपेठ रेल्वे गेट ला लागूनच असलेल्या रमाई नगर या परिसतात लोक पिण्याचे पाणी, किराणा ,लहानात लहान वस्तू घेण्यासाठी फुले चौक येथे जाऊन घेत असत महाकाली कॉलरी व प्रकाश नगर , रमाई नगर येथील लहान लहान मुले मुली याच गेट मधून शाळेत शिकायला ये- जा करत होते पण आता हे दोन्ही गेट बंद झाल्यामुळे या सर्व लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व जनतेकडून सेंटर रेल्वे प्रशासन यांना विनंती करण्यात येत आहे फुले चौका लगत असणारा रेल्वे गेट खुला करण्यात यावं आणि दुसऱ्या गेट मधून पायदळ व सायकल साठी मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी येथील समस्त जनतेची मागणी करण्यात येत आहे आणि लवकरात लवकर या दोन्ही गेट मोकळा करण्या बद्दल निर्णय घेण्यात आला नाही तर मोठ आंदोलन करण्यात येणार याची रेल्वे प्रशासनाने नोंद घ्यावी.