जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर

136

गोंदिया न.प.अध्यक्षपदी सचिन शेंडे तर तिरोडा न.प.अध्यक्षपदी अशोक असाटी

सालेकसा न.पं.अध्यक्षपदी विजय फुंडे तर गोरेगाव न.पं.अध्यक्षपदी तेजराम बिसेन

गोंदिया, दि.21: नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली असून निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गोंदिया येथील निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे नगरपरिषदेचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी सचिन गोविंदराव शेंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस) (सर्वाधिक मते-27,898) यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

तिरोडा येथील नगर परिषदेचा निकाल तहसिलदार नारायण ठाकरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तिरोडा येथे नगर परिषदेचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी अशोक रामजीबापू असाटी (भारतीय जनता पार्टी) (सर्वाधिक मते-8737) यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

सालेकसा येथील नगर पंचायतीचा निकाल तहसिलदार अनिरुध्द कांबळे यांनी तहसिल कार्यालय सालेकसा येथे नगर पंचायतीचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी विजय सुदाम फुंडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (सर्वाधिक मते-2769) यांची निवड झाल्याचे सांगितले.

गोरेगाव येथील नगर पंचायतीचा निकाल तहसिलदार प्रज्ञा भोकरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र गोरेगाव येथे नगर पंचायतीचा निकाल जाहीर केला. यावेळी नगराध्यक्षपदी तेजराम मुन्सी बिसेन (इंडियन नॅशनल काँग्रेस) (सर्वाधिक मते-2638) यांची निवड झाल्याचे सांगितले. निवडून आलेले नवनिर्वाचित उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

*नगरपरिषद गोंदिया :* प्रभाग क्र.1-अमर केवलदास रंगारी, ज्योती राजु फुंडे प्रभाग क्र.2- चंद्रकुमार आत्माराम चुटे. राय नीती विनोद. प्रभाग क्र.3-संगीता सुनील देशमुख. यादव कैलाश राजाराम. प्रभाग क्र.4-बिसेन मेथूला वारलुजी. शुक्ला राज मनोज. प्रभाग क्र.5-शिशिर उदय बिसेन. अग्रवाल सीमा धर्मेश. प्रभाग क्र.6-यादव अजय लक्ष्मणसिंग, ॲड.सरिता शिवराम मेश्राम, प्रभाग क्र.7-बनसोड कल्पना ओमकार, शर्मा शिवकुमार शंकरलाल. प्रभाग क्र.8-गडपायले स्नेहा उत्तमदास, भरने सुनील रघुनाथ. प्रभाग क्र.9-शहारे दीपा सुनिल, यादव पंकज सुंदरलाल. प्रभाग क्र.10-भालेराव सुनिल देवाजी, यादव संध्या उत्तम. प्रभाग क्र.11-यादव नेहा विजयकुमार, अग्रवाल अभय कुंजबिहारीलाल. प्रभाग क्र.12-रुपेश विजयकुमार नशिने, संगीता अशोक गुप्ता. प्रभाग क्र.13-देशमुख चंद्रकला सतीश, माने प्रदिप भिमराव. प्रभाग क्र.14-मेश्राम अनिता सतीश, मिश्रा विवेक दिनेश. प्रभाग क्र.15-कवास सीमाताई हेमंत, पटले संतोष मधुकर. प्रभाग क्र.16-रुसे दिपिका देवेंद्र, बन्सोड बेबीनंदा योगेश. प्रभाग क्र.17-जायस्वाल अनुजकुमार रमेंद्रकुमार, दुर्गा सुनिल तिवारी. प्रभाग क्र.18-नायक नेहा दिनेश, ठाकुर राकेशसिंग अंगदसिंग. प्रभाग क्र.19-जयस्वाल क्रांतीकुमार शिवकुमार, ठाकुर शीलू राकेशसिंग. प्रभाग क्र.20-गहरवार प्रगती गोपालसिंह, राजीव मनोहर आसवानी. प्रभाग क्र.21-वालदे प्रिती राहुल, मिश्रा निर्मला दिलीपकुमार. प्रभाग क्र.22-रगडे विजय गणपत, सोनपुरे शिखा शिवपाल.

*नगरपरिषद तिरोडा :* प्रभाग क्र.1-गुनेरिया राजेश सुकलाल, येरपुडे मनिषा ओमप्रकाश. प्रभाग क्र.2-विजय तुकाराम बन्सोड, कुमूद संदिप मेश्राम. प्रभाग क्र.3-भोंडेकर आशा शामराव, मंसूरी कादर युसूफ. प्रभाग क्र.4-असाटी प्रभु जीवनलाल, धामेचा ममता भोजराज. प्रभाग क्र.5-पालांदूरकर सुनिल गजानन, नम्रता प्रशांत भुते. प्रभाग क्र.6-बुराडे रश्मी विनोद, देवेंद्र राधेश्याम तिवारी, प्रभाग क्र.7-कटरे छाया जगदिश, कटरे अनिकेत सुभाष. प्रभाग क्र.8-लताबाई रामकृष्ण पुडके, बैस ममता आनंद. प्रभाग क्र.9-तिरपुडे मंगला नितीन, पारधी परमानंद रामलाल. प्रभाग क्र.10-येरके रवि नंदलाल, तिवडे उर्मिला शिवाजी.

*नगरपंचायत सालेकसा :* प्रभाग क्र.1-उईके सुनिता विरेंद्र, प्रभाग क्र.2-मडावी विनोद मदनलाल. क्र.3-पुसाम रामबत्ती महेंद्र. प्रभाग क्र.4-रेड्डीवार अतुल सुरेशराव. प्रभाग क्र.5-शिवणकर पल्लवी नितेश. प्रभाग क्र.6-डेकाटे संदिप वामनराव. प्रभाग क्र.7-बंडीवार प्रेरणा दुर्गेश, प्रभाग क्र.8-करवाडे सतीश केवलचंद, प्रभाग क्र.9-असाटी योगीता मनिष. प्रभाग क्र.10-बहेकार कुंदन भरतभाऊ, प्रभाग क्र.11-शिवणकर प्रतिभा भाऊलाल, प्रभाग क्र.12-डोये अजयकुमार प्रभुजी. प्रभाग क्र.13-चुटे अनिता सुरेश, प्रभाग क्र.14-शिवणकर छन्नु भास्कर, प्रभाग क्र.15-लिल्हारे रितेशकुमार भागवत, प्रभाग क्र.16-राऊत ईठाबाई प्रमोद, प्रभाग क्र.17-गावराने किशोर डोमाजी.

*नगरपंचायत गोरेगाव :* प्रभाग क्र.1-रहांगडाले पवनकुमार निलकंठ, प्रभाग क्र.2-अगळे रघुपती राजोबा. प्रभाग क्र.3-तिमेश्वरी रंजित पटले. प्रभाग क्र.4-येल्ले राहूल सोहनलाल. प्रभाग क्र.5-बळगते बिरन झामलाल. प्रभाग क्र.6-येळे सुधीर भाऊलाल. प्रभाग क्र.7-अगडे सुषमा रामभाऊ, प्रभाग क्र.8-शिला हरेंद्र धानगावे,. प्रभाग क्र.9-येरोला मलेशाम अंजैया. प्रभाग क्र.10-शारदा कामेश सांगोडे, प्रभाग क्र.11-बारेवार रंजना शालीकराम, प्रभाग क्र.12-जायस्वाल शामली अरविंद. प्रभाग क्र.13-चंद्रिकापुरे राहुल लक्ष्मणराव, प्रभाग क्र.14-बारेवार आशिष लक्ष्मीकांत, प्रभाग क्र.15-भैरम साहेबलाल होलन, प्रभाग क्र.16-वंजारी गीता रमेश, प्रभाग क्र.17-योगीता तपेश टेंभरे.