सुनंदा कापसे नगराध्यक्षपदी विराजमान

34

शिवसेना शिंदे पक्षाच्या राणी उर्फ सुनंदा कापसे 2254 मताधिक्य घेऊन नगराध्यक्षपदी विराजमान

अच्युत पौळ 

कळंब, प्रतिनिधी            

कळंब, जि.धाराशिव:- कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती या निवडणुकीत शिवसेना शिंदे व भारतीय जनता पार्टी अशी युती तर शिवसेना उबठा , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गट व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गट एकत्रित अशी तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीचा निकाल दिं 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली दहा टेबल वरून तीन राऊंडमध्ये हि मत मोजणी पार पडली या निवडणुकीत शिवसेनेच्या राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे या 2254 मतानी विजयी झाल्या विजयी उमेदवार राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांना 7689 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उबठा उमेदवार मुंदडा रश्मी संजय 5435,

मीनाक्षी श्रीधर भवर 1760 राष्ट्रवादी काँग्रेस

गोरे कविता निवृत्ती 58 अपक्ष,बनसोडे मनीषा 106 अपक्ष शेहनाज शेख 103 रिपब्लिकन सेना NOTA 83 ,नगरसेवक पदासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे 9 उमेदवार विजयी झाले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 1 उमेदवार विजयी झाला एकूण महाविकास आघाडीचे 10 उमेदवार विजयी झाले तर महायुती घटक पक्षात शिवसेना 4 उमेदवार, भारतीय जनता पार्टी 6 उमेदवार विजयी एकूण 10 उमेदवार विजयी झाले प्रभाग व विजयी उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग एक अ योजना वाघमारे भाजपा 595, सुरेखा चोंदे 440 शिवसेना उबाठा,उषा तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस 221, भाजपाच्या योजना वाघमारे 155 मतांनी विजयी, प्रभाग 1 ब शितल चोंदे, भाजपा 515, विश्वजीत जाधव शिवसेना उबठा 455 ,संकर्षण कोकीळ 98 राष्ट्रवादी शचं नितीन वाडे 33 , अपक्ष, भाजपचे शितल चोंदे 60 मतांनी विजयी, प्रभाग क्रमांक 2 ज्योती हारकर 826, उबाठा, आशा पौळ, शिवसेना, 717, सुनिता पवरे 87 राष्ट्रवादी शचं, शिवसेना उबठा पक्षाच्या ज्योती हरकर 109 मतांनी विजयी, प्रभाग दोन ब जमील खाटीक 766 शिवसेना उबठा आरेफ तांबोळी शिवसेना 658 खुरेशी इलियास 167 राष्ट्रवादी काँग्रेस, जमील खाटीक उबठा 108 मतानी विजयी प्रभाग तीन अ ,इंदुमती हौसलमल उबठा 886, सुनंदा गायकवाड 682, शिवसेना, सुनंदा भोसले 85 राष्ट्रवादी शचं, शिवसेना उबठा इंदुमती हौसलमल 204 मतांनी विजयी ,प्रभाग तीन ब रोहन पारख शिवसेना 861, संदीप बिदादा शिवसेना उबठा 570 शिरीष कथले राष्ट्रवादी शचं 142 सुमित बोरगे अपक्ष 25 अण्णासाहेब वाघमोडे अपक्ष 69

शिवसेना रोहन पारख 291 मतानी विजयी प्रभाग चार अ गायकवाड लखन भाजपा 546, विनोद समुद्रे शिवसेना उबठा 419 विकास कदम अपक्ष 229 , विशाल धावारे अपक्ष 15, अभिजीत हौसलमल राष्ट्रवादी 174 भाजपचे लखन गायकवाड 127 मतांनी विजयी चार ब आशा भवर उबाठा 724 स्वाती कदम शिवसेना 612 ,अशा भवर 112 मतांनी विजयी पाच अ सागर मुंडे उबाठा 819 ,सुशील तीर्थकर शिवसेना 649, शिवसेना उबठा सागर मुंडे 170 मतांनी विजयी पाच ब सफुरा काझी शिवसेना उबठा 778 ,संतोष हुरगट शिवसेना 681 , शिवसेना उबठा सफुरा काझी 97 मतांनी विजयी, प्रभाग सहा ,हर्षद अंबुरे, भाजपा 585 ,पांडुरंग कुंभार 577, सचिन तोडकर राष्ट्रवादी 60, भाजपा उमेदवार हर्षद अंबुरे 8 मतानी विजयी सहा ब अर्चना मोरे 658 ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारिका वाघ भाजपा 457, लताबाई बारगुले राष्ट्रवादी शंच 104 ,राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अर्चना मोरे 201 मतांनी विजयी प्रभाग सात अ पूजा धोकटे शिवसेना 894 स्वाती अष्टेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 814 शिवसेनेच्या पूजा धोकटे 80 मतांनी विजयी, सात ब अमरबीन चाऊस शिवसेना 1049 डॉ. साजेद चाऊस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,537 , उदयचंद्र खंडागळे राष्ट्रवादी 140, शिवसेनेचे अमर बिन चाऊस 512 मतानी विजयी , प्रभाग क्रमांक 8अ वनमला वाघमारे उबठा 657 राजेश्वरी टोपे शिवसेना 640, रेखा कसबे अपक्ष 389, अपक्ष ,सरला सरवदे 137, प्रीती हौसलमल 126 शिवसेना उबठा वनमाला वाघमारे 17 मतांनी विजयी, प्रभाग आठ ब मिर्झा मोहसीन शिवसेना उबठा 702 ,मुस्ताक कुरेशी शिवसेना 639 ,लक्ष्मण कापसे राष्ट्रवादी काँग्रेस, 250 , शेख अनिस 25 शिवसेना उबठा मोहसीन मिर्झा 63 मतांनी विजयी प्रभाग नऊ अ अतुल कवडे शिवसेना 741 गजानन चोंदे शिवसेना उबठा 598 शंतनु खंदारे राष्ट्रवादी काँग्रेस 158 शिवसेनेचे अतुल कवडे 143 मतांनी विजयी ,प्रभाग क्रमांक नऊ अ ,रुकसाना बागवान शिवसेना उबठा 627 नाजमीन बागवान शिवसेना 565 सुमित्रा शेंडगे राष्ट्रवादी 304 शिवसेना उबठा रुकसाना बागवान 62 मतांनी विजयी, प्रभाग 10 शाला पवार भाजपा 506, ताई पवार उबठा 405 ,अनिता पवार राष्ट्रवादी शंच 328 , भाजपा शाला पवार 101 मतांनी विजयी ,दहा ब भूषण करंजकर भाजपा 819 ,मंदार मुळीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 349 रेवण करंजकर राष्ट्रवादी काँग्रेस 77 सुदीप देवकर अपक्ष 27 भाजपाचे भूषण करंजकर 470 मतांनी विजयी .

 

या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार आठ मतांनी पराभूत झाले ,तसेच माजी उपनगराध्यक्ष शिवसेना पक्षाचे मुस्ताक कुरेशी हे 63 मतांनी पराभूत झाले या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत कळंब नगरपरिषद निवडणुकीत 1985 मध्ये मुस्ताक काझी हे कमळ चिन्हावर विजयी झाले होते तब्बल 40 वर्षांनी कळंब शहरात कमळ फुलले आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच विजय उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले सहाय्यक निवडणूक अधिकारी अधिकारी मुख्याधिकारी मंजुषा गुरमे, नायब तहसीलदार गोकुळ भराडिया हे होते.