आढाळा शाळेत संत गाडगेबाबांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमाने साजरी

74

आढाळा शाळेत संत गाडगेबाबांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमाने साजरी

अच्युत पौळ

कळंब,जि.धाराशिव:– तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे राष्ट्रसंत, स्वच्छतेचे पुजारी गाडगेबाबा यांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक श्री. तुकाराम कराळे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन व स्वच्छता विषयक कार्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

संत गाडगेबाबांनी केलेल्या स्वच्छता विषयक कार्याची रुजवन विद्यार्थ्यांमध्ये व्हावी व स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवा या उद्देशाने यानिमित्त शालेय परिसर, आढाळा गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय व परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बलभीम राऊत यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजनासाठी प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री. महादेव खराटे व उपक्रमशील शिक्षिका शिवानंद स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.