भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्त सायन कोळीवाडा येथे दिवंगत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य वाचनालयाचे उद्घाटन
सायन: भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्ष पूर्ण झाले असून देशभर पक्षाचा गौरवशाली इतिहास सांगण्यात येत आहे. मुंबईमध्ये देखील अनेक कार्यक्रम करण्यात आले . भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सायन कोळीवाडा विधानसभा शाखेच्या वतीने शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यसैनिक झुंजार कामगार नेते व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते दिवंगत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या स्मरणार्थ वाचनालय उघडण्याचा उपक्रम घेण्यात आला.
सदर प्रसंगी कामगार नेते व इंटकचे आणि मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी श्री अनिल गणाचार्य यांच्या शुभहस्ते लाल बावठ्याचे झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कचरा वाहतूक कामगारांचे नेते काँ. विजय दळवी होते. कॉ.गुलाबराव गणाचार्य वाचनालयाचे उद्घाटन गोदी कामगारांचे नेते कॉ. मूथू र्विरप्पन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधाकर सुराडकर मा. पोलीस महासंचालक. श्री सुकुमार दामले, राष्ट्रीय सेक्रेटरी आयटक. कॉ.मिलिंद रानडे, कामगार नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सेक्रेटरी मुंबई. श्री सुनील गणाचार्य कामगार नेते, मा. नगरसेवक, मा.बेस्ट समिती सदस्य. श्री कचरू यादव, अध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी.श्री.गोपाल शेलार, कामगार नेते, प्रमुख सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्र (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना), कॉम्रेड अशोक कुट्टी,( ए आय डी इ एफ समन्वयक डिफेन्स सेक्टर), श्री. तानाजी घाग, स्थानिक काँग्रेसने नेते व समाजसेवक. श्री बाळ धूपकर गुरुजी, कार्यकारी विश्वस्त, मुरलीधर मंदिर उपस्थित होते. वरील सर्वांनी कम्युनिस्ट पक्षाचा गौरवशाली इतिहास व गुलाबराव गणाचार्य यांच्या आठवणी सांगितल्या व मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला कम्युनिस्ट, काँग्रेस, शिवसेना पक्षाचे अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कॉम्रेड विमल देवेंद्र, राजू सोनवणे, आबासाहेब गायकवाड, सुभाष जाधव, भगवान धोत्रे, विनोद देवेंद्र, गणेश सुपु, गंगाधर रणदिवे, प्रकाश पवार व गणाचार्य विश्वस्त संस्थेचे विश्वस्त रूपाली बारुहा _गणाचार्य इत्यादी यांनी परिश्रम केले .










