बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील आगीची सीआयडीच्‍या माध्‍यमातुन चौकशी करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

52

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील आगीची सीआयडीच्‍या माध्‍यमातुन चौकशी करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

The fire in the bamboo research and training center should be investigated through CID. Sudhir Mungantiwar
The fire in the bamboo research and training center should be investigated through CID. Sudhir Mungantiwar

मनोज खोब्रागडे प्रतिनिधी
चंद्रपूर: – आशिया खंडातील सर्वात मोठा बांबु विषयक प्रकल्‍प असलेल्‍या चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या काही इमारतींना लागलेली आग ही अतिशय दुर्देवी घटना असून या घटनेची चौकशी सीआयडीच्‍या माध्‍यमातुन करण्‍याची मागणी माजी अर्थ व वनमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा आपण वनमंत्री असताना बांबु धोरणाला प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या दृष्‍टीने सुरू केलेला महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. बांबुवर आधारित उत्‍पादनासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण व त्‍यादृष्‍टीने आवश्‍यक संसोधन करण्‍याची प्रक्रिया या केंद्राच्‍या माध्‍यमातुन दीर्घकाळ राबविण्‍यात येणार आहे. रोजगार निर्मीतीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण अशा या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी लागलेली ही आग कृत्रीम आहे वा घातपाताचा प्रकार आहे हे तपासण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. यादृष्‍टीने तातडीने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवून चौकशी करावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.