भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.
दोघांनी मिळुन त्या नाबालीक मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचार करुन जर कोणाला सांगशील तर याद राख अशा शब्दात पीडित मुलीला धमकावण्यात सुधा आल.

अस्मिता सकपाळ प्रतीनीधी
ठाणे, दि. 25 फेब्रुवारी:- जिल्हातील भाईंदर पोलीस स्टेशनचा हद्दीत एका 17 वर्षीय नाबालीक मुलीवर तिघांनी मिळुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीला ओळखीच्या मुलानेच तिला फसवल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. तशी तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या आरोपींना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मुलींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार भाईंदर परिसरात एक 17 वर्षीय नाबालीक मुलगी राहत होती. तिला तिच्या ओळखीच्या मुलाने त्याच्या घरी बोलावले. या ओळखीच्या मुलाने तसेच इतर दोघांनी मिळुन त्या नाबालीक मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचार करुन जर कोणाला सांगशील तर याद राख अशा शब्दात पीडित मुलीला धमकावण्यात सुधा आल.
आपल्यावर झालेल्या अत्याचारा बाबत पीडित मुलीने 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रार दाखल होताच पोलिसांनी सूत्रं हालवली. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 375 तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत पोलिसांना गुन्ह्याची नोंद केली. त्यांनतर पोलिसांनी तक्रारीत नाव असलेल्या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार तीन आरोपींपैकी दोन जण 20 ते 22 वर्षे या वयोगटातील आहेत. तर तिसरा आरोपी हा 50 वर्षे वयाचा आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले हे करीत आहेत.