लोकांवर विश्वास नसल्यानं जिवंतपणी स्टेडियमला नाव, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल.

दयानंद सावंत प्रतिनिधी
मुंबई दि. 25 फेब्रुवारी:- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाऐवजी मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिल्यावरुन टीका केली आहे. देशाला काय नेता मिळाला आहे, लोक विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली असून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका
मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यावरुन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करताना देशाला काय नेता मिळाला आहे? लोक विसरुन जातील याची त्यांना भीती वाटत आहे. यांच्या मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील याची चिंता आहे. यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच स्टेडियमला नावं दिलेय, अशी टीका आंबेडकरांनी मोदींवर केली आहे.