दहावी, बारावीचा परीक्षा संभाव्य वेळापत्रक जाहीर!
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा!
प्रशांत जगताप
26 फेब्रुवारी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. असून त्यानुसार बारावीच्या परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. तर दहावीच्या परीक्षा येत्या 29 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, असा संदेशच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने दिला आहे. जे संभाव्य नियोजन जाहीर झाले आहे, त्यानुसार दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून 21 मे 2021 दरम्यान होण्याची शक्यता आहे. तर बारावीची परीक्षा येत्या 23 एप्रिल ते 20 मे 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या वायरसच्या संसर्गाने या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसताच शासनाच्या परवानगीने मंडळाने या दोन्ही परीक्षांची संभाव्य तारीख जाहीर केली आहे. पण आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून त्याचा परिणाम या संभाव्य तारखांवर होणार काय, याबाबत सध्या अस्पष्ट वातावरण आहे.