Organizing a workshop on agricultural pumps of Bramhapuri MSEDCL.
Organizing a workshop on agricultural pumps of Bramhapuri MSEDCL.

ब्रम्हपुरी महावितरण विभागाची कृषिपंपावर आधारित कार्यशाळाचे आयोजन.

 Organizing a workshop on agricultural pumps of Bramhapuri MSEDCL.

अमोल माकोडे ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी गांगलवाडी परिसरातील वीज वितरण कंपनी मंडळाअंतर्गत मोडणाऱ्या कृषी पंप धारक शेतकऱ्यांकडे मागील कित्येक वर्षांपासूनची कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यासाठी कृषी पंप वीजजोडणी धोरणातर्गत ग्राहकांना दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज 25 फेब्रुवारीला रनमोचंन येथे विधुत वितरण कंपनी कडून कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेत शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती देण्यात आली तसेच कृषी पंप धोरण 2020 अंतर्गत कृषी वीज बिलाची थकबाकी 50 टक्के रक्कम 31 मार्च 20-22 पर्यंत भरल्यास अतिरिक्त 50 टक्के सूट या वर्षापर्यंतच्या थकबाकी वरील संपूर्ण विलंब आकार व्याज दरात सवलत पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकी संपूर्ण व्याज विलंब आकार माप उर्वरित रक्कम कृषी पंप ग्राहकाच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा ग्रामपंचायतीना वसुलीवर भरगोस मोबदला ग्रामपंचायतकडे कृषी वीज बिल भरण्यास पर्याय उपलब्ध ग्रामपंचायतीकडून जमा झालेल्या रक्कमेतून 33 टक्के रक्कम ग्राहकांसाठी पायाभूत सुविधा सुधारणेसाठी वापरल्या जाईल. बाकी नसणाऱ्या व नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना योजनेच्या चालु बिलावर पाच टक्के सवलत सर्व कृषी वीज धारकांना चालु वीजबिल भरणे बंधनकारक राहील व तसे न केल्यास त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल कृषी पंप वीज धारकांनी वीजबिल भरून कंपनीला सहकार्य करावे असे मार्गदर्शन करण्यात आले या सदर विषयाला धरून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यात गांगलवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता तुपे,ब्रम्हपुरी उपविभागाचे सहायक अभियंता समर्थ,लाईनमन नवघडे, रनमोचंन ग्रामपंचायत सरपंच नीलिमा राऊत,उपसरपंच सदाशिव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here