The birth anniversary of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and the civic felicitation ceremony of the officer was held at Mangi (Bu).
The birth anniversary of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and the civic felicitation ceremony of the officer was held at Mangi (Bu).

मंगी ( बु ) येथे ” श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव व अधिकारी मान्यवराचा नागरी सत्कार सोहळा संपन्न.

The birth anniversary of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and the civic felicitation ceremony of the officer was held at Mangi (Bu).
The birth anniversary of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and the civic felicitation ceremony of the officer was held at Mangi (Bu).

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- तालुक्यातील मंगी ( बु ) येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2021 ला स्मार्ट ग्राम, मंगी ( बु ) व पुतळा समिती, मंगी ( बु ) तथा ग्रामस्थ, मंगी ( बु ) यांचे संयुक्त विद्यमाने ” हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज ” यांची 391 वी जयंती साजरी करुन अधिकारी मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. दिनांक 19 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 10-00 वाजता प्रथम चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करुन शिवजन्मोत्सव सोहळाची सुरुवात करण्यात आली. गावात चेतनामय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ग्राम पंचायत सभागृहात मुख्य सोहळा पार पडला. श्री छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या फोटोचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. लहुजी कुळमेथे, अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, राजुरा हे होते तर उदघाटक म्हणून ॲड. राजेंद्र जेनेकर, केंद्रीय सदस्य, अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ , राजुरा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शैलेश कावळे, प्रचारक तथा गावातील मान्यवर रसिकाताई पेंदोर, सरपंच, वासुदेवजी चापले, उपसरपंच, परशुरामजी तोडासाम, अध्यक्ष, ग्राम विकास समिती, अंबादासजी जाधव, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, विश्वेश्वरजी मरस्कोल्हे, अध्यक्ष , पुतळा समिती, गजानन वंजारे , सचिव, ग्रा.पं, रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक, प्रकाश वेडमे, अध्यक्ष, तंटा मुक्त समिती, शंकर तोडासे, सदस्य, सोनबत्तीताई मडावी, वसंत मेश्राम, मोतीरामजी पेंदोर यांची उपस्थिती होती.

स्मार्ट गाव मंगी बु चे वतीने डॉ. लहुजी कुळमेथे व ॲड. राजेंद्र जेनेकर तथा गावातील कृतीशिल ज्ञानेश्वरजी आडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक परशुराम तोडासाम, मु.अ. यांनी केले. तर स्मार्ट ग्रामचा प्रवास वासुदेवजी चापले, उपसरपंच यांनी व्यक्त केले. डॉ. लहुजी कुळमेथे यांनी वैश्विक महामारी कोवीड, आरोग्य करीता उपाययोजना यावर मोलाचे मार्गदर्शन केले. ॲड. राजेंद्र जेनेकर, शैलेश कावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचलन मारोती चापले, शिक्षक यांनी केले. तर आभार पंडीत पोटावी शिक्षक मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, वसंत सोयाम, सुरेश येमुलवार गावातील युवक यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here