जेष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे कोरोनाबधित.

50

जेष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे कोरोनाबधित.

 Senior social worker Prakash Baba Amte coronated.

मनोज खोब्रागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर/गडचिरोली दि. 26 फेब्रुवारी:- जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आंमटे गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट केली. आरटीपीसीआर नीगेटिव आली. पण ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून आज चंद्रपूर ला चेक अप केला. डॉ. दिगंत आणि आई सोबत होते. सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अप मध्ये कोरोना पॉजिटिव असल्याचे स्पष्ट झाले. तज्ञ डॉक्टरांनी  रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हायचा सल्ला दिला आहे. आज नागपुरा धंतोली येथील माहोरकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना परत आपल्या राज्यात वाढतोय. म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. स्वतःची व इतरांची कोरोना संदर्भातील नियम पाळून काळजी घ्यावी.