वर्धा नगर पालिकेच्या सन 2021-22 चा अर्थसंकल्प मंजूर.

✒आशीष अंबादे प्रतीनिधी✒
वर्धा, 26 फेब्रुवारी:- जिल्हातील सर्वात मोठी असलेली वर्धा नगर पालीकेचा सन 2021-22 चा प्रस्तावित अर्थसंकल्प गुरुवारला मांडण्यात आला. आभासी पद्धतीने सर्वसाधारण सभेमध्ये सादर करुन तो मंजुर करण्यात आला.
मजूर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भुयारी गटार योजनेत शहरातील कमकुवत झालेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याला तरतूद करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली. सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी विपीन पालीवाल, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. लेखापाल भूषण चित्ते यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले.
माझी वसुंधरा अभियानाकरिता 1 कोटी तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील आर्थिक वर्षात 5 स्टार रेटिंगकरिता चौक, रस्ता दुभाजक सौंदर्यीकरण, सफाई मशीन, घनकचरा व्यवस्थापन, आदींकरिता 14 वा वित्त आयोग, अमृत प्रोत्साहन निधी, उत्कृष्ट नगरपरिषद या निधी अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील चौकांचे सुशोभाकरण व कारंजे लावण्याकरिता अर्थसंकल्पात 1.35 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 14 वा वित्त आयोग निधी 1.26 कोटी व नप फंडातून 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. भुयारी गटार योजनेमुळे कमकुवत झालेल्या रस्त्याची मजबुती करणे याकरिता अर्थसंकल्पामध्ये 14 वा वित्त आयोग मधून 2 कोटी व 15 वा वित्त आयोग मधुन 1.5 कोटी व दलित वस्ती निधी अंतर्गत-2 कोटी ची तरतूद करून रस्ते मजबूत व सुंदर करण्यात येणार आहेत. शहरातील विविध प्रभागामध्ये रस्ते व नाली बांधकामाकरिता 11 कोटी 70 लाख रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान अमृत योजनेतून नागरिकांकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे स्मारक, नपतील अण्णाभाऊ साठे सभागृहाचे रुपांतर अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेत करण्यात येणा आहे. यातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या तरुणांना फायदा होईल व वयोवृद्ध नागरिकांना वाचनछंद जपण्यासाठी घरपोच पुस्तके पुरविण्यात येईल. कोरोनाशी लढण्याकरिता वर्षाकरिता 60 लाखाची तरतूद कण्यात आली आहे.