हिंगणघाट तालुक्यातील बांमर्डा येथे स्वछता अभियान राबविण्यात आले.
Sanitation campaign was implemented at Bammarda in Hinganghat taluka.
✒ प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी ✒
हिंगणघाट:-जल शक्ती अभियान व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा 1 दिवसीय प्रशिक्षण हिंगणघाट तालुक्यातील बांमर्डा मध्ये नेहरू युवा केंद्र वर्धा व युवा प्रेरणा विद्याथी सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान करण्यात राबवण्यात आले. शाळेच्या परिसरापासून तर संपूर्ण गावातून रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. स्वच्छता करण्यात आली. तसेच युवा मंडळांनी घोषणा देऊन स्वछता अभियान राबविण्यात आली. आपला गाव स्वच्छ तर देश स्वच्छ” या भूमिकेतून गावातील युवा मंडळ युवक व नागरिक नागरिकांनी सहभाग घेतला प्रमुख उपस्थिती राहुल दुरतकर, नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन गावातली जेष्ठ नागरिक महादेव चौधरी, शामराव मेश्राम, कालु हुलके हे होते.
न्यू बाल युवा मंडळ बांमर्डा आणि गावातील नागरिक एकत्रित येऊन गावातील प्लास्टिक, सांडपाणी व कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावून गावाला स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष राहूल दुरतकर यांनी स्वतः स्वच्छता करून युवकांना मार्गदर्शन केले. जलशक्ती अभियान पाण्याचे महत्त्व पाणी किती वापरावे अशी माहिती सांगितली. नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयमसेवक सचिन महाजन यांनी सुद्धा स्वछता अभियानबद्दल माहिती देण्यात आली. गावात मंडळ तयार करून समोर चालवावे यावेळी गावातील आमन निकुरे, विकास हुलके, निखिल हुलके, मंगेश तोडासे, देवदत्ता ठाकरे, गणेश आडे, ऋषभ भोयर, मोनेश कुरसंगे, निखिल हुलके तसेच गावातील नागरिक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शनं कालु हुलके यांनी केले.