स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीचे धगधगते यज्ञकुंड: महापौर राखी कंचर्लावार

66

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीचे धगधगते यज्ञकुंड: महापौर राखी कंचर्लावार

भाजपा महानगर शाखेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली

Swatantryaveer Savarkar is a burning altar of patriotism: Mayor Rakhi Kancharlawar
Swatantryaveer Savarkar is a burning altar of patriotism: Mayor Rakhi Kancharlawar

मनोज खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी✒

चंद्रपूर, दि.27:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीचे धगधगते यज्ञकुंड होते. त्यांनी देशहितासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केले. त्यांचे राष्ट्रसमर्पित जीवन आमच्या पिढीसाठी दीपस्तंभागत मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याची भावना महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी व्यक्त केली .

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजप चंद्रपूर महानगर शाखेतर्फे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ.राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजप महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे आदींची उपस्थिती होती.