Lockdown will not be observed, nor should the public, observe routines and be able to: - Democratic Ripai
Lockdown will not be observed, nor should the public, observe routines and be able to: - Democratic Ripai

लॉकडाऊन पाळणार नाही, जनतेनेही पाळू नये, दिनचर्या करा व सक्षम व्हा:- डेमोक्रॅटिक रिपाई

 Lockdown will not be observed, nor should the public, observe routines and be able to: - Democratic Ripai

Lockdown will not be observed, nor should the public, observe routines and be able to: – Democratic Ripai

संदीप साळवी प्रतिनिधी

मुंबई दि (प्रतिनिधी);- कोरोना शी घाबरू नका, सावधगिरी व काळजी घ्या आणि रोजची दिनचर्या करा, आर्थिक सक्षम बना. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी राज्यातील तमाम नागरिकांना उद्देशून आमच्या प्रतिनिधी मार्फत केले आहे.

कोरोना-फोरोना काहीही नसून हा आजार आधीपासूनच आहे, फक्त बाऊ बनवून सर्वसामान्यांना छळले जात आहे, राज्यासह देशाची आर्थिक बाजू पूर्णपणे कमकुवत झाली आहे. कामातून घरी आल्यास सकाळ संध्याकाळ वाफ घ्या, गरम पाणी पिया. या संसर्गापासून सावधगिरी बाळगा.

सरकारने लॉकडाऊन केल्यापासून हातावर पोट असणाऱ्यांची वाट लागली आहे, बऱ्याच जणांनी अन्नवाचून प्राण सोडले तर काहींनी परिवारासह आत्महत्या केल्या, आजही जनता विद्युत बिला मुळे त्रस्त असून बँक व कर्ज वसुली संस्थामुळे अडचणीत आले आहेत. शेतकरी पुरता गेला असून सर्वसामान्याचे बेहाल झाले आहेत. आजही त्यांच्या संसाराची घडी बसवता आली नाही, गॅस महाग, पेट्रोल डिझेल महाग, भाजीपाला, अन्नधान्य दूध सर्वकाही महागले आहे, खायचे काय आणि उरवायचे काय? हा प्रश्न भेडसावत असतांना पुन्हा लॉकडाऊन करून जनतेला सरकारने वेठीस धरले तर सरकारला अवघड होईल असा गँभिर इशाराही पँथर डॉ. माकणीकर यांनी दिला.

कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांच्या गाई म्हशी, तरुणांच्या मोटारसायकली चार चाकी वाहने ओढून नेले आहे, गॅस व विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहे. या दैनंदिन व अन्य मूलभूत प्रश्नावर सरकार काही न बोलता पुन्हा लॉकडाऊन करून गरीबांना मृत्यूच्या खाईत ढकलत आहे.

लवकरच या प्रश्नासाठी अधिवेशनवर पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात, डॉ राजन माकणीकर, वसंत कांबले, श्रावण गायकवाड, वसंत लांमतुरे, विजय चव्हाण, हरिभाऊ कांबळे, शिव राठोड व अन्य दिगगजांच्या सहभागातून कोरोनाला ना जुमानता मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा पक्षकडून देण्यात आली.

असे असले तरी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लॉकडावून न पाळण्याचे आवाहन करत असून कोणती अडचण आल्यास डेमोक्रॅटिक रिपाई च्या पँथर ना भेट द्यावी असे आवाहन सुद्धा डॉ. माकणीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here