An agitation of computer operators for various demands in Mumbai's Azad Maidan.
An agitation of computer operators for various demands in Mumbai's Azad Maidan.

मुंबईच्या आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी संगणक परीचालकांचं आंदोलन.

An agitation of computer operators for various demands in Mumbai's Azad Maidan.
An agitation of computer operators for various demands in Mumbai’s Azad Maidan.

दयानंद सावंत प्रतिनिधी

मुंबई :- आझाद मैदानात मागील 8 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील जवळपास 1 हजार संगणक परिचालक आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन अर्थसंकल्पातून किमान वेतन द्या. तसेच सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या सीएससी-एसपीव्ही या दिल्लीच्या कंपनीवर कारवाई करा या मागण्या आहेत. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या सोडवल्या नसल्याने संगणक परिचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे कर्मचारी मागील 10 वर्षांपासून संग्राम आणि आपले सरकार या दोन्ही प्रकल्पात काम करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या दिल्लीच्या सीएससी-एसपीव्ही या कंपनीवर कारवाई करावी. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनाची धार आणखी तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

An agitation of computer operators for various demands in Mumbai's Azad Maidan.

मागील 10 वर्षांपासून संग्राम आणि आपले सरकार या दोन्ही प्रकल्पात प्रामाणिकपणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन किमान वेतन देणे, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या दिल्लीच्या सीएससी-एसपीव्ही या कंपनीवर कारवाई करणे या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे संगणकपरिचालकांचे 22 फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन रात्रंदिवस सुरू आहे. परंतु ग्रामविकासमंत्री यांनी संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याबाबत आडमुठेपणाची भूमिका घेतलेली असून दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या सीएससी-,एसपीव्ही कंपनीला कुठलेच टेंडर प्रक्रिया न राबवता आणि मंत्रिमंडळ किंवा उच्चस्तरीय समितीची मान्यता न घेताच सुमारे 1374 कोटींचे 5 वर्षासाठी या प्रकल्पाचे टेंडर दिले आहे,त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनाची धार आणखी तीव्र करू. त्यामुळे त्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागातील संगणकपरिचालकांना न्याय दयावा अशी मागणी संगणकपरिचालक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here