नागपूरमध्ये भाजपच्या नेत्यांवर महीलेचा विनयभंग आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल.

51

नागपूरमध्ये भाजपच्या नेत्यांवर महीलेचा विनयभंग आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल.

In Nagpur, BJP leaders were charged with molestation and atrocities
In Nagpur, BJP leaders were charged with molestation and atrocities

✒️नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपूर,01 मार्च:- नागपूरमधील भाजपचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर एका महिलेल्या धमकावल्या प्रकरणी विनयभंग आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागपुर मधिल एका जमीन भूखंडाच्या वादात पीडित महिलेला धमकावणे व अश्लील शिवीगाळ करणे असा आरोप मुन्ना यादव यांच्यावर आहे. या प्रकरणी मुन्ना यादव यांच्यावर नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुन्ना यादव हे भाजपच्या कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आहे.

प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 40 वर्षीय महिला राहते. या महिलेनं प्रमोद डोंगरे नावाच्या व्यक्तीसोबत जयताला इथल्या पांडुरंग नगर इथे 12 लाखांचा जमिनीचा व्यवहार केला होता. आरोपी प्रमोद डोंगरेने या महिलेला 6 लाख रुपये दिले होते. ही जागा सीनू होरो नावाच्या व्यक्तीची होती, तो झारखंड येथील रहिवासी आहे. सीनू होरो याने प्रमोद डोंगरे याला आपले घर विकण्याचा संपुर्ण अधिकार दिला होता. पण प्रमोदने पीडिते महिलेला कुठेही व्यवहारात उल्लेख केला नाही. त्याने हे घर राजवीर यादव नावाच्या तरुणाला विकले. राजवीर यादव हा मुन्ना यादवचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुन्ना यादव याने पीडिते महिला आपल्या संपर्क साधून कार्यालयात वाद सोडवण्यासाठी बोलावले होते. पण यावेळी हा वाद वाढला. मुन्ना यादव यांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडित महिलेनं केला. अखेर या प्रकरणी आता नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.