नांदेड जिल्हात झालेल्या जातीवादी हल्ल्याचा आर.पी.आय (आठवले) कडुन जाहिर निषेध.
उचीत करवाई करण्यासाठी तहसीलदारानां देण्यात आले निवेदन.

Public protest by RPI (Athavale) against racist attack in Nanded district.
✒राजु मोरे,प्रतिनिधी✒
मुंबई, 1 मार्च:- नांदेड येथे शिवानी जामगा तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील गणेश एडके यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर 8 ते 10 जातीय गावगुंडांनी हल्ला केला त्या निषेधार्थ सौ.शिलाताई अनिल गांगुर्डे राष्ट्रीय सचिव आर.पी.आय.(आठवले), यांच्या नेतृत्त्वखाली मुलुंड तहसीलदार कार्यालयावर आणि मुलुंड पोलीस ठाणे येथे धडक भेट घेवून आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा देशभरात आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन तहसीलदार आणि डी.सी.पी. प्रशांत कदम यांना निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी अनिलभाऊ गांगुर्डे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, विनोदभाऊ जाधव ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, राजू साळवे, सनप्रीतसिंग चड्डा मुंबई उपाध्यक्ष, ज्योती मोहिते महिला नेत्या, अॅड. राजू पराड, सचिनदादा वाघमारे आर पी आय नेते, किशोर संगारे युवा नेते उपस्थित होते
वरील शिष्टमडळाकडून ह्या हल्ल्याची सविस्तर माहिती खालीप्रमाणे देण्यात आली. या हल्ल्यात झगडा सोडविण्यासाठी गेलेल्या गणेश एडके या बौद्ध तरुणाच्या डोक्यामध्ये एकाने कुऱ्हाडीने घाव घातला, यात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घाव अतिशय गंभीर असून त्याच्या डोक्याचे दोन तुकडे झाले आहे. सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे. नांदेड शहरात दाखल असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.