Coal transporter Raju Yadav murder accused arrested
Coal transporter Raju Yadav murder accused arrested

कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.

मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांची मागणी, राजू यादव कुटुंबीयांची उपस्थिती

Coal transporter Raju Yadav murder accused arrested
Coal transporter Raju Yadav murder accused arrested

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 1 मार्च:- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसायातून वाढलेली संघटित गुन्हेगारी ही चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसह सामाजिक आरोग्य बिघडवित असून राजुरा येथे दि. 31 जानेवारी 2021 रोजी कोळसा ट्रान्सपोर्टर व्यवसायी यांची भरवस्तीत चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग या आरोपींनी बंदुकीने गोळ्या घालून केलेली हत्या यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, राजू यादव हत्याकांड कटात सहभागी हत्या पवनी वेकोली माईन्स येथील कोळसा वाहतुकीच्या वादावरून झाली असून पोलिसांनी केवळ चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग ह्या दोघानाच अटक केली असून या हत्याकांड कटात 1) झुल्लूर पाठक, 2) अनिल झाँ, 3) मनिश शर्मा, 4) मनोज शर्मा, 5 ) गुड टायरवाला है सुद्धा हत्येच्या कटात सहभागी असल्याची बाब राजु यादव यांच्या कुटुंबियांनी आपल्या पोलिस तक्रारीत नमुद केलेली आहे. परंतु पोलिसांनी या आरोपींना अटक केली नाही यावरून हे प्रकरण दडपल्या जात असल्याचा आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकड़े यांनी पत्रकार परिषदेत केला.

वेकोली कोळसा याहतुकीत आपली दादागिरी चालावी म्हणून संघटित गुन्हेगारी वेकोली क्षेत्रात वाढलेली आहे. व परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये बंदुका (माऊझर) आणून हत्या करण्याचे प्रकार वाढलेले आहे. यामध्ये बल्लारपूर येथे सुरज बहुरिया यांच्या झालेल्या खुनात वापरलेली बंदुक कुठून आणली याचा शोध पोलिसांनी घेतलेला नाही. शिवाय व राजु यादव यांचा झालेला खुन यामध्ये वापरण्यात आलेल्या बंदुका (माऊझर) हा मृत व्यक्तीकडून खरेदी केल्याचे आरोपीचे बयाण आहे. त्यामुळे परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेल्या बंदुका याचेवर पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणेने गरजेचे आहे. जर सुरज बहुरिया यांच्या हत्येत वापरलेली बंदुक कुठून आणली याचा शोध लागला असता व बंदुका पुरवठा करणाऱ्या मोरक्याना पकडले असते तर राजू यादय यांना मारण्यासाठी बंदुक उपलब्ध नसती. कोळसा ट्रान्सपोर्ट व्यवसायी राजु यादव यांची हत्या संघटित गुन्हेगारीतून करण्यात आली मात्र या प्रकरणात केवळ दोन आरोपी पोलिसांनी पकडले पण यामधै एकुण सात आरोपी असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. राजु यादव यांच्या कुटुंबियांनी पोलिस बयाणात दिलेल्या कटात सहभागी आरोपींची नावे सांगितली त्यांना पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे त्यांच्यापासून राज यादव यांच्या कुटूंबियांच्या जिवाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. राजु यादव यांची हत्या ही संघटित गुन्हेगारीमुळे झालेली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय, कोळसा-रेती तस्करी यामुळे ही संघटित गुन्हेगारी फोफावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरज बहुरिया राजू यादव, शुभम फुटाणे इल्यादींची हत्या कट रचून करण्यात आलेल्या संघटित गुन्हेगारीतून झालेल्या आहे. त्यामुळे राजू यादव प्रकरणात मुख्य आरोपीसह कटात सहभागी असणाऱ्या इतर आरोपीविरोधात म.को.का. अंतर्गत कारवाई करावी दरम्यान राजू यादव यांच्या परिवाराला धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील असे पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी म्हटले आहे दरम्यान चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव यांच्या कुटुंबीयांना पोलीस सरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली. यावेळी मनसे शहर संघटक मनोज तांबेकर, पियुष धूपे, मूतक राजू यादव यांचा मुलगा आशिष यादव पुतण्या संतोष यादव,दीपक यादव, सहकारी चंद्रभान यादय,सचिन मेहरोलीया इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here