मुलीचा छेडछाडीची पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांची गोळ्या झाडुन हत्या.

54

मुलीचा छेडछाडीची पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांची गोळ्या झाडुन हत्या.

हाथरस मधिल धकादायक घटना.

The girl's father was shot dead after she lodged a complaint with the police.
The girl’s father was shot dead after she lodged a complaint with the police.

✒️प्रशांत जगताप क्राईम प्रतीनिधी✒️
हाथरस, दि. 2 मार्च:- उत्तर प्रदेश मध्ये सध्या गुंडे, बलात्का-याच राज्य आहे की काय अस समोर येत आहे. खून, बलात्कार, मारामाऱ्या या आता यूपी मध्ये खुलेआम होत असल्याचे अनेक घटनेवरुन समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपुर्ण भारत हळहळला होता आणी उत्तर प्रदेश सरकारचा निर्षेध आणी धिक्कार करण्यात आला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले. आता त्यात हाथरसमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे.

हाथरस जिल्ह्यातील सासनी क्षेत्रामध्ये असणाऱ्या नौजरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका पित्याने मुलीची छेडछाड केली म्हणून पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार केली म्हणून 4 लोकांनी मुलीच्या वडिलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अमरिश असं आहे.

The girl's father was shot dead after she lodged a complaint with the police.

1 मार्च रोजी मुलीच्या वडिलांवर चार लोकांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. परंतू रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मुलीचे वडील शेतात बटाटे काढत होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांची मुलगी दवाखान्यात पोहोचली तेव्हा आपल्या वडीलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तीला मोठा धक्का बसला.

दरम्यान, पोलिसांनकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिडीत मुलीने पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. संबंधित मुलीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बापाच्या मृत्युनंतर मुलीने हंबरडा फोडला. डीएसपी रुची गुप्ता या प्रकरणात कारवाई करत आहेत.