Mammography examination camp for women held at Rajura Mangi (Bu).
Mammography examination camp for women held at Rajura Mangi (Bu).

राजुरा मंगी (बु) येथे महिलांचे मेमोग्राफी तपासणी शिबीर संपन्न.

अंबुजा सिमेट फाउन्डेशन, रोटरी अमरावती मिडटाऊन मेमोग्राफी तथा डॉ . पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडीकल कॉलेज अमरावती यांचे सौजन्याने मेमोग्राफी तपासणी शिबीर घेण्यात आले.

 Mammography examination camp for women held at Rajura Mangi (Bu).

Mammography examination camp for women held at Rajura Mangi (Bu).

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी.

राजुरा:- तालुक्यातील स्मार्ट ग्राम , मंगी ( बु ) येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2021 ला स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी(बु)  अंंबुजा सिमेट फाउन्डेशन, रोटरी अमरावती मिडटाऊन मेमोग्राफी तथा डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडीकल कॉलेज, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे मेमोग्राफी तपासणी शिबीर घेण्यात आले.

याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन तपासणी शिबीराची सुरुवात करण्यात आली. मेमोग्राफी तपासणी शिबीरासाठी उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवजी चापले, उपसरपंच, ग्रा. पं. मंगी (बु) हे होते तर उदघाटक म्हणून परशुराम तोडासाम, अध्यक्ष, ग्राम विकास समिती, मंगी (बु) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्रजी बैस, कार्यक्रम प्रमुख, अंबुजा सिमेट फाउन्डेशन, उदय निंबोरकर, मॅनेजर, रोटरी अमरावती मिडटाउन मेमोग्राफी, अमरावती, गजानन वंजारे , सचिव, ग्रा.पं. अंबादास जाधव, अध्यक्ष, शा.व्य.स, सुमनताई येमुलवार,उपाध्यक्ष, शा. व्य. समिती, शंकर तोडासे, सदस्य, सोनबत्तीताई मडावी, शिल्पाताई कोडापे, मोतीरामजी पेंदोर, संगीताताई कोडापे, अध्यक्ष, पेसा समिती, लिलाताई सिडाम, सदस्य,शा.व्य.स. यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या शिबीरात मेमोग्राफी तपासणीतून महिलांचे स्तनाचे आजार, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर याबाबत तपासणी करुन निदान करण्याची व्यवस्था या शिबीरातून करण्यात आली. या शिबीरात 100 चे वर महिलांची तपासणी करुन संदर्भ सेवेसाठी रिपोर्ट अमरावती येथे पाठविण्यात आले. हे आरोग्य विषयक शिबीर आयोजनात अंबुजा सिमेंट फाउन्डेशन यांचा मोलाचा वाटा आहे. वासुदेवजी चापले यांनी मनोगतातून महिलांचे सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी अंबुजा फाउन्डेशनचे धन्यवाद व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक यांनी केले . या कार्यक्रमासाठी रोटरी अमरावती मिडटाऊन मेमोग्राफी टीम,अंबुजा सिमेंट फाउन्डेशची टीम, शाळेतील शिक्षक सुधीर झाडे, श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, मारोती चापले तथा गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, सुरेश येमुलवार, वसंता सोयाम यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here