3 मार्चपासून आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

50

3 मार्चपासून आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

In Chandrapur district, the 'Mission Begin Again' order will be extended till March 31.
In Chandrapur district, the ‘Mission Begin Again’ order will be extended till March 31.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 2 मार्च :- 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील 196 शाळांमधील 1571 जागांकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 3 मार्च पासून सुरू होत आहे.

In Chandrapur district, the 'Mission Begin Again' order will be extended till March 31.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेअंतर्गत https://student.maharashtra.gov.in या शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 3 मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीत अर्ज सादर करावयाचा आहे. अर्ज सादर करताना रहिवाशी, वास्तव्याचा पुरावा, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेले वडिलांचे जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, घटस्फोटीत महिला, न्यायप्रविष्ट घटस्फोट प्रकरणातील महिला, विधवा आणि अनाथ बालकांशी संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र अपलोड करावीत, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.