The number of corona infections is increasing day by day in Movad city.
The number of corona infections is increasing day by day in Movad city.

मोवाड शहरात कोरोना संक्रमीतांची संख्या दिवसागणीक वाढतीवर.

मोवाड शहरात 20 तर ग्रामीणमध्ये 6 कोरोना बाधीतांची नोंद.

The number of corona infections is increasing day by day in Movad city.
The number of corona infections is increasing day by day in Movad city.

अनिल ढोके✒
मोवाड, प्रतिनिधी

मोवाड, दि. 2 मार्च:- नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड शहरात कोरोना संक्रमीतांची संख्या दिवसागणीक वाढत असुन अगदी आठवडाभरात शहरात 20 तर ग्रामीण भागात 6 रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आले आहेत. दररोज कोरोना रूग्णांची संख्या वाढत असुन शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात मोवाड शहर हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट केंद्र होते की काय असे पाहावयास मीळत आहे. शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी स्थानीक नगरपरीषद व प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मागील टाळेबंदी ऊठल्यानंतर जिवन पुर्वपदावर आणण्यासाठी नागरीक आपल्या दैनंदीन कामाला लागले होते. वर्षभरानंतर आता कुठे नागरीकांची कामासाठी पायपीट सुरू झाली होती. लाॅकडाऊन काळात अनेकांनी आपला रोजगार गमवावा लागला होता. विद्यार्थ्यांना शिक्षण गमवावे लागले, शेतकर्‍यांसह कामगारही आर्थीक संकटात सापडले. रोजगार नसल्याने मालमत्ता कर, विज बिल, शाळेची फी, मुलांचे लग्ण, सावकारांचे व बैंकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत येथील नागरीक अडकले होते.

वर्षभरापासुन सुरू असलेल्या टाळेबंदीच्या चौफेर संकटातुन आताकुठे थोडी ऊसंत मीळाली असतांना पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे आणखी लाॅकडाऊन लागते की काय ? या भीतेने येथील शेतकरी व नागरीक खचले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रूग्ण वाढत असतांनाच मोवाड प्राथमीक आरोग्य केंद्रातही चाचन्यांचे प्रमाणही वाढवीण्यात आले आहे. त्यांनी मागील टाळेबंदीपासुन तर आजपर्यंत 3500 च्या वर कोरोना चाचण्या केल्या आहेत व करीत आहेत.

The number of corona infections is increasing day by day in Movad city.

कोरोना महामारीच्या काळापासुन तर आजपर्यंत येथील प्राथमीक आरोग्य केंद्रातील सुपरवाईजर कु. वैभवी शेंदरे, डाॅ. प्रतीक राउत, श्रीमती एन. रामटेके, प्रशांत विरखेरे, दिपक सहारे, पि. वानखेडे, मनोज बिले, योगेश क्षिरसागर, कीरण सेलोकर सह सर्व आरोग्य सहाय्यक यांनी मोवाड प्रा. आ. केंद्रातर्गत येणार्‍या शहरी व ग्रामीण तसेच राज्यातील व ईतर राज्यातील प्रवासी नागरीकांची कटाक्षाने कोरोना चाचणी व त्याचप्रमाणे केंद्रांतर्गत येणार्‍या खैरगाव, बेलोना, निपाणी थुगाव, खेडी या ग्रामीण भागातील गावांमध्ये जाउन आपल्या जिवाची पर्वा न करता तेथील नागरीकांची कोरोना चाचणी केली आहे. कोरोना पाॅझेटीव्ह रूग्णांना औषधोपचार करणे, त्यांना कोविड सेंटरला पाठवणे, व त्यांचे योग्य समुपदेशन करणे इत्यादी कामे केली जातात व करीत आहेत.

शहरात आता पुन्हा झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता आठवड्याभरात मोवाड शहरातील 590 नागरीकांची तर महीनाभरात 1900 नागरीकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात आजपर्यंत मोवाड शहरात 20 तर ग्रामीणमध्ये 6 असे 26 रूग्ण कोरोना पाॅझेटीव्ह आढळुन आले आहे. झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा हा प्रसार लक्षात घेता मोवाड न. प. ने शासनाच्या निर्देशानुसार ता. 27 व 28 या दोनही दीवस जनता कर्फ्यु म्हणुन कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, भाजीपाला विक्रेते, शिक्षणसंस्था, यांनी सर्वत्र कडकडीत बंद पाळला.

मोवाड शहरात दिवसागणीक वाढत चाललेला हा कोरोनाच्या प्रसारावर स्थानीक नगरपरीषदेने वेळीच व तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आणखी विलंब केल्यास भविष्यात मोवाड शहर हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट केंद्र होण्याला वेळ लागणार नाही असे मत येथील जानकार व सुज्ञ नागरीकांकडुन ऐकावयास मीळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here