चंद्रपूर जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित.

85

चंद्रपूर जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित.

 Applications are invited till March 22 for Chandrapur District Youth Award.

Applications are invited till March 22 for Chandrapur District Youth Award.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 3 मार्च:- महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे च्या वतीने सन २०२०-२१ या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वैयक्तिक स्वरुपात एक युवक एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार असून पुरस्कारस्वरुप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख रु. 10 हजार, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च 2021 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसेच संस्था ह्या सार्वजिनक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट- 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेकरिता पुरस्काराचे स्वरुप रोख रु. 50 हजार, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेला विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. परिपुर्ण प्रस्ताव दिनांक 22 मार्च 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी कळविले आहे.